Header Ads Widget

Responsive Advertisement

श्री दुर्गराज रायगड शिवभक्तांसाठी खुला

 
.                  छत्रपती श्री शिवाजी महाराज
 

   ऐन दिवाळीत पर्यटकांसाठी तसेच शिवभक्तांसाठी व शिवपाईकांसाठी एक गोड बातमी म्हणजे श्री दुर्गराज रायगड हा किल्ला पर्यटकांसाठी खुला केला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे खुली करण्यात आले आहेत. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. परंतु, येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी मास्क बंधनकारक असणार आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्व रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद ठेवण्यायात आली होती. अनलॉकच्या काळात लोकांकडून व दुर्ग प्रेमीन कडून पर्यटन स्थळे खुली करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत.

 

 

    छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधीस्थळ रायगड

मागील सात ते आठ महिन्यापासून कारोना प्रादुर्भावामुळे लोकांना पर्यटन स्थळवरती प्रवेश दिला जात नव्हता. मात्र आता रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पर्यटन स्थळी खुले करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पर्यटकांना इतर पर्यटनस्थळांचा आनंद घेता येणार आहे.
 
 

Post a Comment

1 Comments