Image credit: Olympic.com
भाला फेकीत मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा सुद्धा सुभेदार आहे. नीरज चोप्रा हे भारतीय भालाफेक पट्टू आहेत.८ ऑगस्टपर्यंत त्यांनी जगभरातील मुख्य स्पर्धांमध्ये तब्बल ६ सुवर्णपदके संपादन केले आहेत. सुभेदार नीरज चोप्रा हे भारतासाठी ट्रॅक आणि फिल्ड क्षेत्रामध्ये सुवर्ण मिळवणारा एकमेव खेळाडू आहे. नीरज चोप्रा यांचे वय अवघे २३ वर्ष आहे. आपल्या बलाढ्य आत्मविश्वासावरती सुभेदार नीरज चोप्रा यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. वैयक्तिक खेळामध्ये भारताला सुवर्णपदक देणारे,हे दुसरे भारतीय खेळाडू ठरले आहेत. याच्या आधी अभिनव बिंद्रा यांनी २००८ ऑलम्पिक मध्ये आशी कामगिरी केली होती.
नेमबाजीत रजतपदक पटवून देणारे राजवर्धन राठोड हे भारतीय सैन्यात कर्नल होते. भारताला वैयक्तिक खेळामध्ये रजतपदक पटवून देणारे कर्नल राजवर्धन राठोड पहिली खेळाडू होते.२००४ च्या ऑलम्पिक मध्येमध्ये पुरुषाच्या डबल ट्रॅप या नेमबाजी प्रकारात त्यांनी रजतपदक पटकावले होते.
2 Comments
भारतीय सेना🇮🇳🇮🇳🙏🙏
ReplyDeleteProud of u army
ReplyDelete