जितेंद्र आव्हाड बलात्कार करणाऱ्याला पाठीशी घालत आहेत?'मरू दे ना तिला
दबाव टाकताना शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख.
गेल्या दोन महिन्यापासून एका प्रसिद्ध कॅसेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्या वर एका महिलेने बलात्कारचे आरोप केल्याची बातमी दोन महिने झाले चर्चेत आहे. २०१७ ते २०२० दरम्यान महिलेवर बलात्कार झाल्याचे महिलेने आरोप केले आहेत. या महिलेच्या म्हणण्यानुसार भूषण यांनी आपल्याला मोठ्या प्रोजेक्ट मध्ये काम देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून अत्याचार केलेत. या गुन्ह्यात भूषण यांच्यावर ३७६,४२०,५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणात आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव चिकटले आहे. याचे कारणही तसेच आहे, पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या मल्लिकार्जुन पुजारी या सामाजिक कार्यकर्त्याला चक्क धमकी देण्याची ऑडिओ क्लिप वायरल झाले आहे.
हेही वाचा: मोदींचे मंदिर कोणी बांधले व कोणी हटवले?
वायरल ऑडिओ क्लिप मधील संभाषण
जितेंद्र आव्हाड: तू कोणत्या तरी माणसाला एका पोरी वरून ब्लॅकमेल करत आहेस?
मल्लिकार्जुन पुजारी: साहेब तुमच्या पर्यंत आलं का?
जितेंद्र आव्हाड: माझ्यापर्यंत नाही ते प्रकरण शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत गेलय...
मल्लिकार्जुन पुजारी: साहेब मी ब्लॅकमेल नाही करत,ती मुलगी माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आले होती.
जितेंद्र आव्हाड: जाऊदे मरू दे तिला.., कशाला करता नको ते उद्योग भे?#%£.. तूला माणूस कोण आहे, ते माहित आहे का तुला?
मल्लिकार्जुन पुजारी: साहेब मला माहित आहे कोण आहे तो, पण ती मुलगी तिचे जीवन संपवायला गेली होती.
जितेंद्र आव्हाड: जाऊदे मरू दे तिला, तू फुकट कशाला बदनाम होतो.
मल्लिकार्जुन पुजारी: मी कशाला बदनाम होतोय. उलट मी त्याला काही बोललो नाही तोच म्हणतोय,मुलीला गुन्हा दाखल करून देऊ नका, त्यानंतर मी त्याला सांगितले कि, मी काय समजवू बाबा...
जितेंद्र आव्हाड: तू काय मध्ये पडू नकोस..
हेही वाचा: राष्ट्रवादी महिलांचे जागरण-गोंधळ आंदोलन
"आज आम्ही पीडित महिलेसह राज्यपालांची भेट घेतली.मला शिवीगाळ करण्यात येत आहे आरोपी व्यक्ती खूप मोठी आहे त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे यासंदर्भात आम्ही कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पीडित महिलेला शेवटपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन"
मल्लिकार्जुन पुजारी
तुम्ही विचार करू शकता की, हे किती खेदजनक आहे. महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट मंत्री एका महिले विषयी म्हणतात की, तिला मरु द्या.जितेंद्र आव्हाड म्हणतात की,शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या पातळीवरील हे प्रकरण आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे दिग्गज नेते बलात्कार प्रकरणात हस्तक्षेप करतील, हे मला पटत नाही. जितेंद्र आव्हाड पोलिसांवर दबाव टाकत आहेत. हे चुकीचा आहे. मल्लिकार्जुन पुजारी यांनीसुद्धा कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दिली पण पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिला.
एस.बाळकृष्ण
(पीडित महिलेचे वकील)
0 Comments