Header Ads Widget

Responsive Advertisement

भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत



भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली


3 फोर व्हीलर,103 टू व्हीलर, दहा चांदीच्या गदा व 22 तोळे सोने अशी बलाढ्य बक्षिसे देण्यात आले आहे.



पिंपरी चिंचवड: बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठमोठे बैलगाडा शर्यती होत आहेत मात्र बंदीनंतर च सर्वात मोठं बैलगाडा शर्यत मैदान भोसरीचे विधानसभा आमदार पैलवान महेश (दादा) किसन लांडगे देशातील सर्वात बलाढ्य बैलगाडा शर्यत मैदान जाधववाडी, चिखली २८ मे ते ३१ मे होणार होते पण २००० विक्रमी गाड्यांची विक्रमी नोंद झाल्यामुळे हे मैदान २७ मे ते ३१ मे असे असे पाच दिवसांसाठी आयोजित केले आहे. आकर्षक बक्षिसे व जबरदस्त बैलगाडा शौकीन या बैलगाडा पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत असे आयोजकांकडून सांगितली जात आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अनोखे मैदान म्हणून या मैदानाकडे बघितले जात आहे.


                                  प्रथम तीन बक्षिसे


केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या मैदानावर ती दर दिवशी वेगवेगळ्या नेत दिग्गज नेत्यांची हजेरी पाहायला मिळणार आहे. यामध्ये गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व कामगार नेते नरेंद्र पाटील अशा दिग्गज मंडळींची हजेरी या मैदानाला लाभणार आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम 31 मे रोजी सकाळी ८ वाजता माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व नारायणपूर चे अण्णा महाराज यांच्या हस्ते होणार आहे.




तब्बल दीड कोटी रुपये बक्षिसांचा सह दोन कोटी रुपये या दिमाखदार बैलगाडा शर्यत मैदानावर्ती खर्च केलेले आहेत. प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस श्री निलेश उद्धव बोराटे (युवा नेते) यांच्याकडून जेसीबी व बोलेरो बक्षीस देण्यात आले आहे. अशी येथेच्छ बक्षिसे या मैदानावर ती लावण्यात आलेले आहेत.


Post a Comment

0 Comments