हिटलरने दिली होती मेजर ध्यानचंद यांना ही ऑफर कोणताही विचार न करता ऑफर नाकारली
हेही वाचा: सूर्यकुमार यादव खेळणार पहिला कसोटी सामना?
त्यांनी हजार पेक्षा जास्त गोल त्यांच्या नाववर नोंदवले आहेत. भारतीय हॉकीने जे काय इतिहासिक असे किस्से केले आहेत, ते आज पर्यंत आपल्याला ऐकायला मिळतात. खासकरून 1932 च्या ऑलिंपिक फायनल मध्ये भारताने अमेरिकेला 24-1 असे हरवून सुवर्णपदक पटकावले होते. या ऐतिहासिक फायनल मध्ये स्वतः ध्यानचंद यांनी आठ गोल नोंदवले होते. याच्या आधीच्या ऑलम्पिक मध्ये म्हणजेच लॉस एंजेलिस ऑलम्पिक फायनल मध्ये भारताने 35 गोल नोंदवले होते त्यापैकी 25 गोल हे मेजर ध्यानचंद यांचे होते. भारतीय हॉकीसाठी मेजर ध्यानचंद यांचा कालावधी हा सुवर्णकाळ होता. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या परफॉर्मन्सने सर्वांना आकर्षित केलं होतं.
हेही वाचा: जोश मध्ये होश असलेला खेळाडू रोहित शर्मा
हिटलरला का फटकारले?
मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार म्हणून विश्वभर ओळखले जात होते. त्यांची लोकप्रियता देश-विदेशात होती याचे कारणही तसेच होते. बरलीन ओलंपिक मध्ये जर्मनीचा तानाशाह एडोल्फ हिटलर यांना मेजर ध्यानचंद यांना भेटण्याची इच्छा झाली. 1928 आणि 1932 मध्ये भारत सुवर्णपदक जिंकला होता. बरलीन ओलंपिक मध्ये मेजर ध्यानचंद हे संघाचे कर्णधार होते. बरलीन ओलंपिक चा फायनल 14 ऑगस्टला होणार होता. पावसामुळे ही फायनल 15 ऑगस्टला करण्यात आली. फायनल पाहण्यासाठी जर्मनीचा तानाशाह हिटलर उपस्थित होता. फायनल मध्ये जर्मनी आणि भारत हे दोन्ही संघ आमने सामने होते. पहिल्या हाफ मध्ये जर्मनी संघ 1-0 आघाडीवरती होता.
दुसऱ्या हाफ मध्ये मेजर ध्यानचंद बिनबुटाचे मैदानात उतरले. दुसऱ्या हाफ मध्ये मेजर ध्यानचंद यांनी जे काही केलं ते अविश्वसनीय होतं. 8-1 अशी भारताने आघाडी घेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. हे पाहून हिटलरला वाटले मेजर ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिक मध्ये चुंबक असावं. ध्यानचंद यांची हॉकी स्टिक तोडण्यात आली यामध्ये कोणते प्रकारचे चुंबक नव्हते. त्यानंतर हिटलरने ध्यानचंद यांना बोलावून घेऊन त्यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफर व जर्मन आर्मीतील उच्चपद देण्याविषयी बोलणे केले. पण मेजर ध्यानचंद हिटलरच्या ऑफरला बळी पडले नाहीत. मेजर ध्यानचंद यांनी क्षणार्धात हिटलरला फटकारले.

1 Comments
Nice information
ReplyDelete