Header Ads Widget

Responsive Advertisement

रोड मराठा सुभेदार नीरज चोप्रा: यांचे काय नात आहे महाराष्ट्राशी?

२३ वर्षीय सुभेदार नीरज चोप्रा यांनी टोकियो ओलंपिक २०२१ मध्ये भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले पण सुभेदार नीरज चोप्रा यांचे महाराष्ट्राच्या मातीशी रक्ताचे नाते जोडलेले आहे. सुभेदार नीरज चोप्रा यांचे पूर्वज महाराष्ट्रातील आहेत. मराठ्यांच्या नावाचा अपभ्रंश होऊन उत्तर भारतातील आडनावाशी एकरूप आहे. नीरज चे वडील रोड मराठा असल्याचे सांगतात.सुभेदार नीरज चोप्रा यांचे वडीलांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

     Image credit: We Maratha Facebook Page

पानिपतच्या युद्धाचे वेळेस जी आपले मराठी सैन्य देशाच्या संरक्षणासाठी आणि अब्दालीचा पाडाव करण्यासाठी उत्तर भारतात म्हणजेच पानिपतावरती गेले. पानिपतनंतर तिथे राहिलेल्या मराठा सैन्याचे वंशजाचे ते वारसदार आहेत. दिल्लीच्या जवळच पानिपत, कुरुक्षेत्र, कर्नाळा आणि काही प्रमाणात जींद जिल्ह्यात मराठा समाज वसलेला आहे. 

           Image credit: Olympics Twitter page

पानिपतात यमुनेच्या काठावरची अत्यंत सुपीक जमीन मराठ्यांनी आपल्या रक्ताने आणि घामाने पवित्र करून टाकलीय. तेथील मराठा सैन्याच्या वंशजांना त्यांना आज रोड मराठा म्हणून ओळखले जाते. सुभेदार नीरज चोप्रा हे सुद्धा त्यांचेच वंशज आहेत.

         Image credit: Olympics Twitter page

महाराष्ट्रातील अठरापगड जातींचा तयार झालेला रोड मराठा हा विविध क्षेत्रांमध्ये आघाडी घेत आहे त्याचे उत्तम उदाहरण सुभेदार नीरज चोप्रा हे आहेत.

                महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले |
               असे वीर वैरी पराधीन तेचा,
               महाराष्ट्र आधार भू-भारताचा||

Post a Comment

2 Comments