पानिपतच्या युद्धाचे वेळेस जी आपले मराठी सैन्य देशाच्या संरक्षणासाठी आणि अब्दालीचा पाडाव करण्यासाठी उत्तर भारतात म्हणजेच पानिपतावरती गेले. पानिपतनंतर तिथे राहिलेल्या मराठा सैन्याचे वंशजाचे ते वारसदार आहेत. दिल्लीच्या जवळच पानिपत, कुरुक्षेत्र, कर्नाळा आणि काही प्रमाणात जींद जिल्ह्यात मराठा समाज वसलेला आहे.
पानिपतात यमुनेच्या काठावरची अत्यंत सुपीक जमीन मराठ्यांनी आपल्या रक्ताने आणि घामाने पवित्र करून टाकलीय. तेथील मराठा सैन्याच्या वंशजांना त्यांना आज रोड मराठा म्हणून ओळखले जाते. सुभेदार नीरज चोप्रा हे सुद्धा त्यांचेच वंशज आहेत.
महाराष्ट्रातील अठरापगड जातींचा तयार झालेला रोड मराठा हा विविध क्षेत्रांमध्ये आघाडी घेत आहे त्याचे उत्तम उदाहरण सुभेदार नीरज चोप्रा हे आहेत.
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले |
असे वीर वैरी पराधीन तेचा,
महाराष्ट्र आधार भू-भारताचा||
2 Comments
Proud of you 🚩🚩🇮🇳🇮🇳🙏💐
ReplyDeleteअप्रतिम माहिती..👌
ReplyDelete