Header Ads Widget

Responsive Advertisement

तीन क्रिकेटपटू ज्यांनी 1990 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले,अजूनही खेळत आहेत. कोण आहेत ते तीन खेळाडू?

तीन क्रिकेटपटू ज्यांनी 1990 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले,अजूनही खेळत आहेत. कोण आहेत ते तीन खेळाडू?

 

क्रिकेट खेळामध्ये बदलत्या दुनिया नुसार आपल्याला बदल पाहायला मिळत असतात. त्यामुळे क्रिकेट हा खेळ जागतिक पातळीवरती पोचलेला आहे. असे अनेक क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी आपले कारकीर्द गौरवशाली बनवून,जे निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत तर काही क्रिकेटपटू निवृत्त झालेले पाहायला मिळतील. परंतु त्यातील खेळाडू अजून आपल्याला खेळता दिसतात ज्यांनी क्रिकेटचा मोठा प्रवास पहायला आहे.

आज आपण अशाच तीन खेळाडूंबद्दल चर्चा करणार आहोत. ज्या खेळाडूंनी आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण 1990 साली केले ते तीन खालील प्रमाणे आहेत.

१. क्रिस गेल

  Image Credit: Chris Gayle Twitter Page


40 वर्षीय क्रिस गेल याचे नाव क्रिस्तोपर हंड्री गेल अस आहे. क्रिस गेल हा जगातील स्पोटक फलंदाजा पैकी एक खेळाडू आहे. या स्पोटक फलंदाजीमुळे त्याला जगभर युनिव्हर्सल बॉस असे संबोधले जाते. क्रिस गेल ने 11 सप्टेंबर 1999 रोजी टोरंटो येथे आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण भारतीय संघ विरुद्ध केले.
त्याने आपल्या वेस्टइंडीज संघासाठी 103 कसोटी सामने, 300 एक दिवसीय सामने व 52 टी-20 सामने खेळले आहेत. जरी तो एक दिवशीय व कसोटी सामन्यातून निवृत्त झाला असला,तरी तो टी ट्वेन्टी क्रिकेटचा अजून भाग आहे.

 Image Credit: Google

२. हरभजन सिंग

हरभजन सिंग यांना भारतीय टीम कडून खेळलेला सर्वोत्कृष्ट फिरकीपटू म्हणून ओळखले जाते. त्याकाळच्या सक्रिय खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणजे हरभजन सिंग. हरभजन सिंग यांनी 17 एप्रिल 1998 रोजी न्यूझीलंडविरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
हरभजन सिंग यांनी आपल्या भारतीय संघासाठी 103 कसोटी, 236 एकदिवशीय व 28 टी-20 सामने खेळले आहेत. त्यादरम्यान त्यांनी अनुक्रमे 417, 269 व 25 विकेट घेतली आहेत. हरभजन याने आपला अखेरचा सामना खेळला असला तरी त्याने खेळातून निवृत्ती घेतलेली नाही.

Image Credit: Shoaib Malik Twitter Page

३. शोएब मलिक

पाकिस्तानचा माजी कर्णधार तसेच स्टार अष्टपैलू शोएब मलिक 90 च्या दशकातील सक्रिय खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. शोएब मलिक ने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण शारजाह येथे 14 ऑक्टोबर 1999 रोजी केले.
त्याच्या कारकिर्दीत त्याने 35 कसोटी,287 एक दिवशीय,113 टी -20 खेळले आहेत. शोएब मलिक याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली असली तरी तो t20 फॉरमॅट मध्ये अजून सक्रिय आहे.

Post a Comment

0 Comments