Header Ads Widget

Responsive Advertisement

रेल्वे प्रवास करताय या चुका कराल तर 3 वर्षाची कोठडी भोगावी लागेल अन् दंडही !

 


रेल्वे प्रवास करताय या चुका कराल तर 3 वर्षाची कोठडी भोगावी लागेल अन् दंडही !
 
 
भारतीय रेल्वेने दिला सावधानतेचा इशारा: रेल्वे प्रवास करताना या चुका कराल तर 3 वर्षाची कोठडी भोगावी लागेल अन् दंडही !

नवी दिल्ली: Indian railway alert: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना ही महत्वाची सूचना आहे. भारतीय रेल्वेने रेल्वेच्या बाबतीत प्रवाशांना मोठा अलर्ट दिला आहे. रेल्वेमध्ये लागणारे आगीनचे वाढते प्रमाण पाहता हा निर्णय भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी आधिकारिक नोटीस दिलेली आहे. रेल्वेने ही सक्ती प्रवाशांच्या सुविधेसाठी व सुरक्षेबाबत दिले आहे.

 Image Secure: Indian Railway Twitter Page




भारतीय रेल्वेने ट्विट करुन हे सांगितल?
रेल्वेने यासाठीच ट्विट व सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. रेल्वेने ट्विट करून सांगितले आहे की, प्रवासाचे वेळेस कोणतेही ज्वलनशील पदार्थ(railway ban flammable goods) घेऊन जाऊ नका आणि कोणाला घेऊन येऊन ही देऊ नका. असे केल्यास दंडनीय गुन्हा आहे. असे केल्यामुळे कायद्यांतर्गत जेल होऊ शकते. पश्चिम मध्य रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेमध्ये आग पसरवणे अधिनियम,१९८९ चे कलम १६४ च्या अंतर्गत कायद्याने गुन्हा आहे. या मध्ये पकडले गेलेल्या व्यक्तीला तीन वर्ष तुरुंगवास व भारतीय रेल्वेच्या नियमानुसार दंड देखील द्यावा लागेल.


         Image Secure: Indian Railway Twitter Page
 


या गोष्टीवर रेल्वे मध्ये निर्बंध
भारतीय रेल्वेच्या ट्विट व नोटीस नुसार प्रवासी रेल्वेच्या डब्यामध्ये रॉकेल, वाळके गवत, पेट्रोल, स्टोव, माचिस,फटाके, गॅस टाकी . आग लागणारी कोणतेही वस्तू घेऊन आपण प्रवास करू शकणार नाही. रेल्वेने हे पाऊल उचलण्याचे कारण की, प्रवाशांचा प्रवास सुखाचा व सुरक्षित करण्यासाठी हे नियम लावण्यात आले आहेत. यासंदर्भात रेल्वेने सक्त प्रवाशांना इशारा दिला आहे.

Post a Comment

1 Comments