इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यात जागरण- गोंधळाच आंदोलन
काही दिवसांपासून डिझेल-पेट्रोल बरोबरच गॅस दरवाढ सुद्धा भडका घेत आहे. या विरोधात ठीक-ठिकाणी आपल्याला आंदोलन पाहायला मिळत आहेत. या दरवाढी विरोधात महिला जास्त आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत. डिझेल पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीचा फटका हा सामान्य जनतेला बसत आहे. त्यात नुसतेच पुण्यात स्वारगेट येथे राष्ट्रवादी महिलांच्या कडून पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीविरोधात जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. आंदोलनातून निषेध दर्शविण्यात आला.
हेही वाचा: T20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर
दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिलांच्या कडून रस्त्यावर उतरून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन स्वारगेट चौकात करण्यात आले यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेल. पेट्रोल डिझेलचे दर एका साईडला उच्चांक गाठत आहेत, तर दुसऱ्या बाजूला गॅस भाव सुद्धा जोर धरत आहेत. याचा फटका गृहिणी ते नागरिकांपर्यंत सर्वांनाच बसत आहे. याच सर्व गोष्टीच्या विरोधात हे आंदोलन राष्ट्रवादीकडून केले जात आहे. डिझेल पेट्रोल बरोबरच गॅसचे ही दर कमी करावेत ही मागणी केली गेली. मोदी सरकारच्या विरोधात निषेधार्थ वेगवेगळ्या घोषणा या वेळी देण्यात आल्या.
काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?
केंद्र सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी आंदोलन केले आहे. महागाईच्या विरोधातला महिलांचा राग, रोष या आंदोलनामुळे व्यक्त झाला. केंद्र सरकारमुळे महिलांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. केंद्र सरकारला सद्बुद्धी यावी असे रूपालीताई चाकणकर म्हणाल्या.
0 Comments