Header Ads Widget

Responsive Advertisement

पुण्यात मोदींचे मंदिर कोणी बांधले व कोणी हाटवले? हा चर्चेचा विषय बनला आहे.

पुण्यातील एका बीजेपी कार्यकर्त्यांने चक्क पंतप्रधान मोदींना देवाच्या रुपात मानून या कार्यकर्त्यांने मोदींचे मंदिर उभारले आहे. हे मंदिर त्याच्या वैयक्तिक जागेमध्ये उभा केले आहे. हे मंदिर पुण्यातील औंध या भागात उभे केले आहे. मंदिर उभा करणाऱ्या युवकाचे नाव मयूर मुंडे असे आहे. याचे वय ३७ वर्ष आहे.

पुणे: प्रत्येक पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असतो. अशाच एका बीजेपी सच्चा कार्यकर्त्याने मोदींना देवाचा दर्जा देऊन मोदींचे मंदिर बांधून त्यामध्ये पंतप्रधान मोदींची मूर्ती स्थापन केली आहे. बीजेपी कार्यकर्त्यांना त्याचे आश्चर्य वाटले नसेल, मात्र बाकी समाजामध्ये या गोष्टीची मोठी चर्चेचा पाहायला मिळत आहे.याच्या आधी आपण मोदी भक्त हा शब्द ऐकला असेल यालाच साजेसे कृत्य या कार्यकर्त्यांनी केले आहे.


मोदींना देवाचा दर्जा देऊन मोदींचे हे मंदिर बीजेपी सच्चा कार्यकर्ता मयूर मुंडे यांनी उभा केले आहे. हे मंदिर पुण्यातील औंध भागात स्वतःच्या मालकीच्या जागेवरती उभे केले आहे. पिंपरी चिंचवड मधील मार्बल विक्रेता दिवांशू तिवारी यांनी या मंदिरात बसलेली मूर्ती जयपूर वरून तयार करून आणलेले आहे. हे सर्व उभा करण्यासाठी १लाख ५० रुयांपर्यंतचा खर्च आला आहे. १५ ऑगस्ट २०२१ रोजी पुण्यातील ज्येष्ठ नागरिक के.के नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिराच्या बाहेर एक फलक लावण्यात आला आहे त्यावर ती मोदीने आत्तापर्यंत केलेल्या कामांचा उल्लेख करण्यात आले आहे. हे मोदींचे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातले पहिले मंदिर आहे.


मोदींची मंदिरातील मूर्ती का हटवली?
भाजपचा या मंदिराशी काही संबंध नसल्याचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी रात्री या मंदिरातील पुतळा हटवण्यात आला व मंदिराला भगव्या कापडाने गुंडाळण्यात आले आहे. त्यामुळे वेगळी चर्चा रंगत आहे. हा पुतळा मयूर मुंडे यांनी स्वतः हालवलेला आहे याचे स्पष्टीकरण मयूर मुंडे यांनी दिले आहे.


स्पष्टीकरण
पंतप्रधान मोदींच्या प्रेमापोटी आम्ही हे मंदिर उभारले होते. मात्र बुधवारी रात्री भाजप वरिष्ठ नेत्यांचा फोन आला. जिवंत व्यक्तीचे मंदिर बांधने हे पक्षाच्या तत्वात बसत नाही, असं आम्हाला सांगितलं गेलं. आपल्या भावना मंदिर बांधून न दाखवता आपल्या कार्यातून व कृतीतून व्यक्त कराव्यात. असं सांगण्यात आलं. म्हणून मंदिरातील पुतळा हटवण्यात आला आहे. असे मयूर यांनी स्पष्टीकरण दिली.

Post a Comment

0 Comments