Image Credit: England cricket & Virat Kohli Twitter Page
भारतीय कर्णधार विराट कोहली हा वारंवार आपली मोठी धावसंख्या उभा करण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र त्याला अध्याप यश संपादन झालेले नाहीये. गेल्या दोन वर्षात विराटचे एकही शतक नाही. त्यामुळे विराट थोडा चिंतेत दिसत आहे व चुकीच्या फटक्यांमुळे (wrong shot selection) त्याला अपयश येत आहे.
विराटने अँडरसनला शिवीगाळ का केली?
भारतीय कर्णधार विराट कोहली हा मैदानात असताना अँडरसनवरती चांगलाच तापलेला पाहायला मिळाले. काय घडलं नेमक? विराट कोहली आपल्या वैयक्तिक १० धावांवरती खेळत असताना, त्याने अँडरसनला उग्र भाष्य केले. हे भाष्य विराट कोहलीने अँडरसन खेळपट्टीवरती धावला म्हणून केले. विराट कोहली जे काही बोलला ते बोलणे स्टँप माइक मध्ये एकली गेले. विराट बोला "हे तुझ्या घरामागचे अंगण नाही" या दरम्यान विराटने त्याला शिवीही घातली.
चौथ्या दिवसाअखेर ८२षटकांमध्ये ६ बाद १८१ धावा केल्या आहेत. रिषभ पंत १४ धावांवरती तर ईशांत शर्मा हा ४ धावांवरती नाबाद खेळत आहे. भारताकडे आत्ताआत्ता १५४ धावांची आघाडी आहे. कसोटी सामन्यांमध्ये वेगवेगळ्या फटक्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिषभ पंत कडे सर्वांच्या नजरा आहेत.
2 Comments
Shaaandaar
ReplyDelete👌🏽👌🏽
ReplyDelete