Header Ads Widget

Responsive Advertisement

टी २० वर्ल्ड कप २०२१ चे वेळापत्रक झाले जाहीर, कोणत्या दिवशी आहे भारत-पाकिस्तान सामना?

वर्ल्डकपच्या सर्व स्पर्धा आई.सी.सी (ICC)आयोजित करतं, मात्र यावर्षी चे नियोजन बी.सी.सी.आय (BCCI)कडे दिलेले आहे. हे सामने भारतामध्ये होणार होते,मात्र कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर,हे सामने यू.ए.ई (United Arab Emirates)मध्ये होणार आहेत. एक दिवशी क्रिकेटमधील सगळ्यात छोटा फॉर्मेट म्हणून टी ट्वेन्टी क्रिकेटकडे बघितले जाते. मोठी फटकेबाजी या फॉर्मेटमद्ये पाहायला मिळते. परंतु यावर्षी T20 वर्ल्डकपला जोर येणार आहे. थोडासा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याचे कारण ही असेच आहे, या सामन्याच्या आधी इंडियन प्रीमियर लीग ( IPL) चे सामने होणार आहेत.
                       Image Credit:ICC
 आयपीएल खेळणारे सर्व खेळाडू आपापल्या टीम साठी चांगले योगदान देताना दिसतील. मात्र यूएई मध्ये स्पिनर ला मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बाब आहे. २००७ नंतर भारतासाठी वर्ल्डकपवर पकड मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे, असे क्रिकेट एक्सपर्ट म्हणत आहेत.

               Image Credit: BCCI Twitter Page

या तारखेला असेल भारत-पाकिस्तान सामना?
२४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई. येथे भारतीय वेळेनुसार सहा वाजता सुरू होईल. महत्त्वाची बाब अशी की आत्तापर्यंतच्या झालेल्या सामन्यात पाकिस्तान एकदाही विजय झालेला नाहीये. २००७ पासून आपण पहात आलो आहे. दोन्ही संघ आमने सामने आले की, नेहमीच सामना रोमांचक होतो. खुन्नस सुद्धा पाहायला मिळते, संपूर्ण जगाचे या सामन्यावरती लक्ष असते. भारताने २००७ ला कर्णधार एम एस धोनी च्या मार्गदर्शनाखाली पहिली ट्रॉफी मिळवली होती त्यानंतर अध्यापक भारताला t20 वर्ल्डकप  वर कब्जा मिळवता आलेला नाही. आता ही जबाबदारी आय. सी. सी एकही ट्रॉफी न जिंकलेल्या विराटवर आहे.
                           Image Credit:ICC

कोण असेल 2021 वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार?
क्रिकेट एक्सपर्ट यांच्याकडून सांगितले गेलेल्या माहितीनुसार येत्या वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार ज्या संघाकडे बॅटिंग लाईन अप आणि चांगला स्पीन अटॅक असेल असे संघ या वर्ल्डकपचे दावेदार असतील ते संघ भारत, इंग्लंड आणि वेस्टइंडीज आहेत.

                              Image Credit:ICC

Post a Comment

0 Comments