कोरेगाव भीमा हिंसा : NIA च्या आरोपपत्रात JNU विद्यार्थी, माओवाद्यांना देशाविरुद्ध युद्ध करायचे होते
महाराष्ट्र, पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथील स्मारका जवळ 1 जानेवारी 2018 मध्ये हिंसाचार झाला. याच्या एक दिवस आधी म्हणजे 31 डिसेंबर 2017, रोजी पुणे शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये देश विरोधी व प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप NIA चा आहे.
कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी NIA ने आपल्या आरोपपत्र दाखल केले आहे. एल्गार परिषद व माओवादी यांच्यामध्ये संबंध व एकोपा असल्याचा आरोप एन.आय.एन केला आहे. या लोकांना देशाविरुद्ध युद्ध करायचे होते व आपले राज्य प्रस्थापित करायचे होते असा आरोप एन.आय.ए केला आहे.
एल्गार परिषद आणि माओवाद यांच्या मधील संबंधाबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की या संघटनांना देशाविरुद्ध युद्ध करायचे होते.
हेही वाचा: राष्ट्रवादी महिलांकडून जागरण गोंधळ-आंदोलन
कोरेगाव भीमा युद्ध स्मारकाजवळ का घडली?
पुण्यात शनिवार वाड्याच्या समोर 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये वक्त्यांनी प्रक्षोभक भाषणे जबाबदार असल्याचा पुणे पोलिसांनी सांगितले आहे. माओवाद्यांशी कथित संबंध असलेल्या लोकांनी ही परिषद घेतली असा दावा पुणे पोलिसांनी वर्तवला होता.
हेही वाचा: मोदींचे मंदिर कोणी बांधले व कोणी हलवले?
JNU आणि TISS च्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे का?
JNU आणि TISS विद्यार्थ्यांचे दहशत व गदारोळ माजवण्यासाठी भरती करण्यात आली होती. असे आरोपपत्रात म्हंटले आहे.NIAने ऑगस्टच्या सुरुवातीलाच याच्या बाबत मसुदा सादर केला होता. यामध्ये नक्षल्यांच्या समर्थनात पुस्तक व अन्य साहित्य वाटप करण्यात आले होते.
4 Comments
Right bhava
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteहरामखोर आहेत हे गद्दार भारताचे खावुन देशविरोधी एजंडा चालवतात, संविधान बचाव,वाले मेले का आता
ReplyDeleteसत्यमेव जयते 🙏🚩
ReplyDelete