आठ वर्षांनंतर सर्वात मोठ बैलगाडा जंगी मैदान होणार का? सविस्तर वाचा
गोवंश टिकला तर शेती- माती आणि गाव माणसाच्या गोष्टी टिकतील. आपली संस्कृती टिकेल. देशी दुभते दुधाळ जनावर पाहायचे असतील, येणाऱ्या पिढ्यांना सकस आहार द्यायचा असेल, बैलपोळा साजरा करायचा असेल, आपली अखंड परंपरा जपायची असेल, तर गोवंश टिकवावा लागेल. गोवंश वाढवावा लागेल. यासाठी आपल्या परंपरेत पहिल्यापासूनच एक आधीपासून व्यवस्था आहे. ती म्हणजे बैलगाडा शर्यतीची. बैलगाडा शर्यतमुळे शेतकरी व बैलगाडा मालक आपल्या बैलांचे, आपल्या प्राण्यांचे उत्तम पोषण करतो. त्यामुळेच आपल्या भागात खिल्लार सारखा गोवंश वाढला टिकला. बैलगाडा शर्यती बंदीनंतर अनेक गोवंश नामशेष होत आहेत.पण बैलगाडा शर्यती वरती बंदी आणून हे गोवंश नामशेष करायचे आहेत का?
Image Credit:Google
बैलगाडा मालक चालकांनी व शेतकऱ्यांनी बैलगाडा शर्यत चालू व्हावी म्हणून बरेच प्रयत्न केले, पण म्हणावी अशी प्रशासना कडून दखल घेतली गेली नाही.काही बैलगाडा मालक चालक न्याय मागण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कडे गेली होते. त्यानंतर शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी व गोवंश टिकला पाहिजे या हेतूने दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी भव्य-दिव्य छकड गाडी जंगी मैदानाची घोषणा केली.हे मैदान आजच्या दिवशी दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी मु.पो- झरे, ता.आटपाडी जि.सांगली येथे सकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.हे मैदान पारंपारीक म्हणजेच आपल्या जुन्या पध्दतीने होणार आहे.हा खुला अड्डा तब्बल आठ वर्षांनंतर होत आहे.त्याचा विचार करून मैदानवरती ९ फाट्या आकल्या आहेत. या मैदानाचे संपूर्ण नियोजन आमदार श्री.गोपीचंद पडळकर यांनी हाती घेतलेलं आहे.या मैदानाचे बक्षिस पत्र व नियमावली खालील प्रमाणे आहे.
बरेच बैलगाडा चालक-मालक या अड्डयासाठी गेली तीन दिवस झाली येत आहेत.ह्या बैलगाडा शर्यतीची दखल संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींनी घेतलेली आहे . पोलिसांनी आजूबाजूच्या ९ गावा मध्ये संचारबंदी लावली आहे. दहा-दहा कि.मी लोक चालत पोलिसांना चूकहून मैदानाच्या ठिकाणी पोहचत आहेत.पोलिसांनी मैदानाला परवानगी दिलेली नाही.त्यामुळे मैदान होणार की,नाही याच्यावर प्रश्न चिन्ह आहे.मात्र आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे, मैदान १००% होणार.
1 Comments
खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विजय होईल💯
ReplyDelete